न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी – चिंचवड प्राधिकरणातील हद्दीत कोरोना काळात अनधिकृत बांधकामे फोफावली होती. त्यासह इतर अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच सुरू असलेली कामे तातडीने थांबविण्यात आली.
दरम्यान, या काळात उभ्या राहिलेल्या अनधिकृत कामांवर सप्टेंबरअखेरीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुंभार यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी प्राधिकरणाने कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मागवला होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त मिळाला नव्हता. कोरोनाच्या काळात सर्व यंत्रणा कोरोना ड्यूटीमध्ये गुंतली होती. त्यामुळे या काळात बहुतांश ठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली. सप्टेंबरपासून त्याची माहिती संकलन करण्यास सुरवात केली आहे. तसेच आठ ते दहा जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत.