न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सराईताला पिस्तूलसह अटक केली आहे. आकाश मल्लाप्पा जमादार (वय २५, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक स्वप्निल भरत शेलार यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाल्हेकरवाडी चिंचवड येथे रावेत रोडवर एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलीसनाईक स्वप्निल शेलार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला पकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्यावर सशस्र दरोड्याची तयारी, जबरी चोरी, शस्र बाळगणे असे तीन गंभीर गुन्हे सांगवी, देहुरोड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.


















