न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२०) :- ‘सूचना का अधिकार कार्यकर्ता असोसिएशन’ संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता समिती, महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदी प्रिती सुधीईर गेअहानी तर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदी गुलामअली भालदार यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे सहसंपर्क प्रमुख आजिनाथ आघाव यांनी केली.
सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात योग्य सहकार्य मिळावे. सरकारी, निमसरकारी कार्यालये, महापालिका, जातपडताळणी कार्यालय, गृहसंकुल आदी व्यवस्थेत लाभार्थी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, त्यांना हवी असणारी आवश्यक माहिती सन्मानाने मिळावी.
रेल्वे, रस्ते, एस.टी, बस सेवा आदींबाबत प्रवासी हिताच्या सुधारणा उपाययोजना आदी पाठपुरावा करून रहिवासीयांना सेवा सुविधा उपलब्ध करून देणे तसेच, वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जाईल, असा मानस यावेळी समितीचे राज्याचे प्रदेशअध्यक्ष साईनाथ शिंदे यांच्याशी नियुक्तीप्रसंगी बोलताना भालदार यांनी व्यक्त करून लवकरच शहर कार्यकरणीची घोषणा करण्याचे आश्वासन दिले.


















