न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- भोसरीतील संतोष अण्णा गव्हाणे स्पोर्ट्स क्लबने कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तसेच दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी रस्त्यावर मंडपाची उभारणी केली. त्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी अडथळा निर्माण झाला.
तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली. याबाबत संतोष भानुदास गव्हाणे (वय ४४), संजय शिवाजी नरवडे (वय ३५), निलेश शिवाजी नरवडे (वय ३०, तिघे रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई सुरेश नानासाहेब वाघमोडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांना सीआरपीसी कलम ४१ (अ) १ नुसार नोटीस समजपत्र देऊन सोडून देण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.