न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून आज सोमवारपासून (दि. १९) मोटारी व जड वाहनांची चाचणी नाशिक फाटा येथील ‘ आयडीटीआर ‘ मध्ये घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तर दुचाकीची चाचणी या कार्यालयाच्या इमारतीच्या मोकळ्या मैदानात होईल, त्याबाबतची माहिती उपप्रादेशिक अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
प्रशासकीय कारणास्तव आणि जनतेच्या सोयीसाठी १९ ऑक्टोबरपासून पिंपरी – चिंचवड कार्यालयामार्फत विविध संवर्गाच्या नवीन वाहन परवान्याची तसेच, कालबाह्य झालेल्या नूतनीकरणाची चाचणी येथे होणार आहे. त्यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती देण्यात आली.
त्यानुसार मोटारी (खासगी व परिवहन), जड वाहने या चाचण्या आयडीटीआरमध्ये होणार आहेत, तर दुचाकी परवान्याच्या चाचणी या कार्यालयाच्या इमारतीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात होतील. त्याचप्रमाणे तीनचाकी व इतर सर्व वाहनांची चाचणी ही ट्रैफिक पार्क येथे होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.