न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२०) :- चिखली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे सात लाख रुपयांचा २७ किलो ५०० ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. १७) दुपारी सव्वाएक वाजता केली आहे.
राहुल भीमराव पवार (वय २१, रा, ओटाम्कीम, निगडी), अपोल अशोक शिंदे (वय २६, रा, अंकुश चौक, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार प्रमोद जयराम लहि यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीत गांजा विक्रीसाठी आरोपी आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात लाख रुपयांचा २७ किलो ५०० ग्राम गांजा आणि ९० हजारांची दुचाकी असा एकूण ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले दोन्ही आरोपी गांजा विक्रीसाठी आले असल्याची कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे.