- स्वतंत्र विभागीय कार्यालय उभारणीची राहुल कलाटे यांची उपआयुक्तांकडे मागणी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) :- वाकड-ताथवडे-पुनावळेचा सलग्न भाग थेरगाव करसंकलन कार्यालय क्षेत्रातून वगळण्यात यावा. तसेच येथील नागरिकांसाठी स्वतंत्र करसंकलन विभागीय कार्यालय कार्यन्वित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक राहुल कलाटे यांनी पिं. चिं. महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या उपआयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाकड-ताथवडे-पुनावळे हे परिसर नव्याने विकसित होत आहेत. येथील नागरिकांना करविषयक कामकाजासाठी थेरगाव करसंकलन कार्यालयाशी सतत संपर्क करावा लागतो. थेरगाव करसंकलन कार्यालयावरती एक लाखांपेक्षा जास्त मिळकातींचा भार असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव कर संकलन विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रामधील गट क्र.१ (कावेरी नगर ), गट क्र. ७ व ८ (वाकड), गट क्र.९ (पुनावळे) तसेच ताथवडे मधील सलग्न भाग ( गट क्र. १०,११ व १२) समाविष्ठ करून वाकड-ताथवडे पुनावळे किंवा भौगोलिक परस्थितिचा आढावा घेण्यात यावा. वाकड-ताथवडे-पुनावळेतील करदात्यांच्या सोयीच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र करसंकलन विभागीय कार्यालय कार्यन्वित करण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे या निवेदनात कलाटे यांनी म्हटले आहे.


















