- अन्यथा अंतरवाली सराटी येथे येऊन तोंडाला काळे फासू..
- शिवभीम सेनेच्या भरत ओव्हाळांचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑक्टोबर २०२६) :- जंजिरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या मागणीवर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा अंतरवाली सराटी येथे येऊन तोंडाला काळे फासू, असा इशारा शिवभीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष भरतभाऊ ओव्हाळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.
अडीच वर्षांपूर्वी या मागणीचे निवेदन जरांगे यांना दिले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचा दावा ओव्हाळ यांनी केला. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. विविध सामाजिक विषयांवर आंदोलन करणारे जरांगे या मागणीवर मौन का बाळगून आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी जरांगे यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओव्हाळ यांनी केली.
जरांगे यांच्या आंदोलनाला यापूर्वी पाठिंबा दिला असतानाही या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. दोन दिवसांत उत्तर न मिळाल्यास आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला.


















