- विजयादशमी उत्सव ऑनलाईन पद्धतीने शाखास्तरावर साजरा होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑक्टोबर २०२०) :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा शस्त्रपूजन उत्सव व पथसंचलनाचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी संघातर्फे विजयादशमीला शहरात विविध ठिकाणी शस्त्रपूजन व पथसंचालनाचे आयोजन करण्यात येते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून शहरातील कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे संघचालक डॉ. गिरीश आफळे आणि जिल्हा कार्यवाह विलास लांडगे यांनी दिली.
कोरोनामुळे विजयादशमी उत्सव ऑनलाईन पद्धतीने शाखास्तरावर साजरा करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने समाज तसेच कुटुंब व प्रबोधनपर व्याख्यानमाला, रक्तदान – शिबिरे, निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य, चित्रकला आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात विविध वयोगटातील बाल, तरुण, माता, भगिनी नागरिक सहभागी होणार आहेत.