न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२४) :- लोखंडी पिस्टल व जिवंत काडतुस (राऊंड) बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना ते जवळ अवैधरित्या बाळगले. पोलिसांच्या दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखेला कुणकुण लागताच (दि. २८) रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास माऊली हार्डवेअर शेजारी, मरकळ गाव येथे कारवाई करून दोघांपैकी एकाला ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून ८०,००० रु किं चे दोन लोखंडी पिस्टल व २०००/- रु कि चे दोन जिवंत काडतुस (राऊंड) पोलिसांनी जप्त केले. १. अर्जुन भाऊराव सुर्यवंशी (वय २० वर्षे रा. कोकण धर्मशाळा पदमावती रोड आळंदी) याला अटक केली असून पाहीजे आरोपी अंकित भस्के (रा. चाकण – पुणे पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याचा पोलीस शोध घेत आहेत.
आळंदी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर १२८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी दरोडा विरोधी पथक गुन्हे पुढील तपास करीत आहेत.