स्फोटात एकाचा मृत्यू; दोघं जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२४) :- स्फोटामुळे अपघात होऊ शकतो हे माहीत असताना देखील आरोपींनी जिलेटीन जवळ बाळगले. तिघांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता त्यांच्याकडुन न्यु हॉलंड ट्रॅक्टरद्वारे क्रॉम्प्रेसरने फुटींग होलचे काम करुन घेतले. दरम्यान ट्रॅक्टरच्या क्रॉम्प्रेसरचा आणि त्यावरील जिलेटीनचा स्फोट झाल्याने त्यात राजेश कुशवाह हे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. तसेच आलोक व रमेश कोल यांना लहान मोठ्या गंभीर दुखापतीस आरोपी कारणीभुत झाले आहेत.
हा प्रकार (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास करंज विहीरे हद्दीत जमिन गट नं १६२ मध्ये, नविन स्टोन क्रेशर प्लान्टवर ता. खेड जि.पुणे येथे घडला.
याप्रकरणी आरोपी १) स्वप्निल बाबाजी कोळेकर २) निलेश सदाशिव कोळेकर ३) बाबाजी रामदास कोळेकर (रा. करंज विहीरे), ४) रविंद्र अरुण तोजे (रा. वडगाव पाटोळे ता.खेड) यांच्या विरोधात महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात २७२/२०२४ भा.द. वि. कलम ३०४ (२), ३३८, सह विस्फोटक अधिनियम १८८४ चे कलम ९ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्र. ४ याला अटक करण्यात आली आहे. पोउपनि जाधव पुढील तपास करीत आहेत.