न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- पुणे शहरातील हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुलीवर अत्याचार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पॉस्को, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन नराधमांना पकडण्यात यश आले आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी सायंकाळी १५ वर्षांची पीडित मुलगी घराबाहेर पडली होती. त्यावेळी चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर सलग दोन दिवस त्यांनी मुलीवर बलात्कार केला. मुलीने गुरुवारी मध्यरात्री नराधमांच्या तावडीतून सुटका करून घेतली. मुलीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयिताना अटक केली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे.












