न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) रोजी १६१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील १ व हद्दीबाहेरील ३ अशा ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेला एक पुरुष रुग्ण हा ७८ वर्षीय असून तो कासारवाडी येथील रहिवासी आहे. हद्दीबाहेरील परंतु पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात मृत्यू झालेले तीन पुरुष रुग्ण हे धानोरी वय- ४० वर्षे, आंबेगाव ५७ वर्षे, पेरणे फाटा ५५ वर्षे येथील रहिवाशी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८७५९४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८४२४६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५२७ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.












