न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२०) :- खोटी बिले दाखवून कंपनीकडून वीस लाखांहून अधिक रक्कम उकळल्याप्रकरणी आणि कंपनीतील वाहनांचे महागडे सुट्टेभाग चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
खेड तालुक्यातील निघोजे येथील एडीसीएल फॅपिको इंजिनिअरिंग कंपनीतील कर्मचाऱ्याने खोटी बिले तयार करून २० लाख ३१ हजार ११७ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
कंपनीची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सुभाष लक्ष्मण बलाटे (तनिष्क ऑकिंड, चऱ्होली रस्ता आळंदी, खेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. निशांत सिद्राम कांबळे (४२, काकडे पार्क, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.












