- एक महिन्यात तब्बल तीन लाख रुपयांचा दंड केला वसूल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३. नोव्हेंबर २०२०) :- विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींविरोधात रावेत पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून मागील एक महिन्यात तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अर्जुन पवार, तृप्ती तोडकर, प्रशांत दळवी आणि पोलीस कर्मचारी यांचे पथक कारवाई करीत आहे.
महापालिकेच्या हद्दीत दररोज १५० ते २०० च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. मास्क न घालणाऱ्या व्यक्तीवर रावेत पोलीस दंडात्मक कारवाई करीत आहेत. अनेक नागरिक स्वतःची काळजी योग्य पद्धतीने घेत असल्याने शहरासह विविध उपनगरात कोरोनाचा विळखा सैल होत चालला आहे. ही शहरवासीयांसाठी आनंदाची बाब असली तरी आणखीन कोरोनाचे संकट पूर्णपणे नष्ट झाले नाही. त्यामुळे शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस नियमित कारवाई करीत आहेत.
मास्क न घातल्यास पोलिसांकडून ५०० रुपये दंड आकारला जात आहे. रावेत पोलिसांनी त्यांच्याकडून ऑक्टोबर महिन्यात तीन लाख रुपये दंड वसूल केला आहे. शासनाच्या नियमानुसार विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राजेंद्र राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रावेत पोलीस चौकी यांनी केले आहे.