- कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२०) :- हिंजवडीतील पांडवनगरमध्ये उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये कमी प्रतीच्या दारुचा भरणा करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा टाकून १० लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नाग्या डाया चावडा (वय ३७) याला अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला हिंजवडी परिसरात एका कारखान्यात बनावट मद्य निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारखान्यावर छापा टाकून तब्बल १० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारखान्यात उच्च प्रतीच्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या मध्ये बनावट मद्याचा भरणा करून ते विकले जात होते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळावरून उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या भरलेल्या ११५ बाटल्या, ३०० रिकाम्या बाटल्या, १८० लेबल, ४०० बॉटल कव्हर असा एकूण दहा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नाग्या डाया चावडा त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस आर दावेराव करीत आहेत. कोणत्याही परिसरात बनावट मद्याची खरेदी अथवा विक्री होत असल्याची नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











