- ठाकरे सरकारची रसिकांना दिवाळी भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२०) :- राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
करोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता जलतरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.
थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOP पाळणं बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणाऱ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उघडण्यास संमती देण्यात आली आहे.