न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- आज देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. केंद्रातील सत्ताधारी डोळे झाकून आहे. यामुळे महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न अत्यंत जटील झाला असून आपण या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याची प्रतिक्रीया, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित महिला सरचिटणीस आशा काकडे यांनी व्यक्त केली आहे.
पिंंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी आशा काकडे यांची शहर काँग्रेस पक्षाच्या महिला सरचिटणीस पदावर नुकतीच नियुक्ती केली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सचीन साठे, काँग्रेस पक्षाच्या श्यामला सोनावणे उपस्थित होत्या.
आशा काकडे या अत्यंत परखड वक्त्या तसेच उद्योजिका म्हणुन ओळखल्या जातात. अत्यंत अभ्यासू असलेल्या आशा काकडे यांनी आजवर शेकडो महिलांना स्वबळावर उभे करण्यासाठी सहकार्य केले आहे.