न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- भाजपाचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे आणि पत्नी उषा काकडे यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली.
२०१८ मध्ये मेव्हणा युवराज ढमाले यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी युवराज ढमाले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, “आमच्यातील कौटुंबिक वाद आहे. दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आता केला आहे. या दोन वर्षात फिर्यादीबरोबर माझं आणि पत्नीचे साधं बोलणे देखील झालेले नसताना मग आत्ताच हे आरोप का केले याचं आश्चर्य वाटत आहे. आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आज न्यायालयात प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करत आहोत”.