न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२०) :- बसची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून खासगी प्रवासी बस वाहतुकीस सरकारने पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे दिवाळी सणानिमित्ताने गावी जाणाऱ्या पिंपरी – चिंचवड येथील चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
तसेच, गेल्या अनेक महिन्यांपासून थंडावलेला वाहतूक व्यवसायाला पुन्हा नव्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसना वाहतूक करण्यास परवानगी मिळाल्याने बस मालक आणि प्रवासी यांनी समाधान व्यक्त केले.
दिवाळी निमित्ताने नागरिकांना गावी जाण्यासाठी कसरत करावी लागते. यंदा कोरोनामुळे बऱ्यापैकी कामगार आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, सोशल डिस्टसिंगचे पालन आणि गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.