- सीरमसह ब्रिटनच्या फायझर कंपनीचा भारताकडे लसीकरणाठी अर्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अॅझेन्काच्या करोना लसीच्या आपात्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. तर दुसरीकडे ‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे.
ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे. दरम्यान, यानंतर भारत बायोटेकच्या स्वदेशी ‘कोवॅक्सिन या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे.
स्वदेशी करोना लस तयार ‘कोवॅक्सिन’ विकसित करणारी कंपनी भारत बायोटेकनं आपल्या लसीच्या आपात्कालिन वापरासाठी डीजीसीआयकडे परवानगी मागितली आहे. सूत्रांद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. फायनॅन्शिअल एक्सप्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.















