न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड तेली समाजाचे पदाधिकारी सुभाष पन्हाळे, डी. डी. चौधरी, अनिल राऊत, सुनिल ऊर्फ नाना डोंगरे, विठ्ठल सायकर, शेखर लगड, राजेंद्र चौधरी, वैभव नारळे, श्रीकृष्ण नालट, पी. टी. चौधरी, जितेंद्र चौधरी, सुनिल गासे, अनिल चौधरी, सुभाष चौधरी, सुनिल सहिंद्रे, प्रविण खोडे, भरत चौधरी, योगेश गोमासे, सुनिता राऊत, निलांगी राऊत, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, बाळासाहेब कापसे, अविनाश तिकोणे आदी उपस्थित होते.















