न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- मयत तरुणाचे आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भाडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास शेखर औंध हॉस्पिटल समोरील पार्किंगजवळ असलेल्या एका झाडाजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी शेखरच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले.
आरोपी खून केल्यानंतर फोन बंद करून पळून गेले होते. आंबेडकर चौक, भाऊ पाटील रोड, बोपोडी येथे नाल्याच्या कडेला आरोपी लपून बसल्याची माहिती सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. दोन्ही आरोपींना नाल्याजवळ सापळा लावून अटक केली.
मयत हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात मारामारीच्या एक गुन्हा दाखल आहे. गोविंद केडाशिवा वाघेला (वय ५०, रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेखर मनोहर चंडाले (वय २७. रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय अशोक नाईक ( वय २३. रा. सर्वर क्वार्टर, सांगवी फाटा, औध), विक्रम उर्फ विकू श्रीकेसरीन सिंग (वय १८, रा. बोपोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
















