न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात रविवारपासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणातील गारवा गायब झाला आणि उकाडा वाढला होता. मात्र, सोमवारी सकाळी शहरात गारठा वाढला अन अचानक हलक्या स्वरुपाच्या रिपरिप पावसाला सुरुवात झाली.
शहरात पुढील दोन दिवस आकाश अशंतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसाच्या तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या तापमान १७.९ अंश सल्सिअस नोंदविण्यात आले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ६.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे संपूर्ण राज्यात सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. दक्षिणेकडून येत असलेल्या बाष्पयुक्त वार्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसमध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.














