न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२०) :- काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, कै. भाऊसाहेब तापकीर प्राथ. विद्यामंदिर, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मिडीअम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने कै. लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या हस्ते कै. लक्ष्मीबाई तापकीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका अनिताताई तापकीर, संस्थेचे सचिव सागर तापकीर, संचालक मोहन तापकीर, संचालक राजू पवार, संचालक नितीन पवार, संचालक दिपक चौधरी, संचालक शिवाजी तेलंगे, श्रीम. लक्ष्मीबाई तापकीर माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत वाखारे, केमदारणे सर, रसाळ सर, बल्लाळ सर, अत्तार सर, देव सर, माळी सर व शिवाजी भांड आणि सहकारी शिक्षकवृंद तसेच कै. भाऊसाहेब तापकीर प्राथ. विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक नवनाथ गारगोटे सर व रामदास जाधव, संगीता पाटोळे, संदिप भोईटे, सुनीता पाटोळे, सुवर्णा फडतरे, नवनाथ देवकर, भिमराव लगड, शिक्षकेतर कर्मचारी संतोष पानसरे, मुख्या. रेणू वर्मा व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सचिव सागर तापकीर यांनी केले.