- पुणे विभागात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (एक) संतोष चंद्रकांत पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पुणे विभागाच्या महसूली संवर्गात पदोन्नती दिली आहे. या बदलीबाबतचे आदेश महसूल विभागाचे उपसचिव डाॅ. माधव वीर यांनी दिले.
दोन वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २०१८ रोजी नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्तपदी झाली होती. त्यानूसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना पुणे विभागात महसूली संवर्गात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.