न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२०) :- यमुनानगर येथे एलआयसी बिल्डिंग जवळ असलेल्या एका कॉम्प्युटर दुरुस्तीच्या दुकानाला आग लागली. या आगीत दुकानात काम करणाऱ्या नेपाळ येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (सोमवारी दि. २१) सकाळी उघडकीस आली.
अंकित अगरवाल (वय २७. रा, यमुनानगर, निगडी. मूळ रा. नेपाळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आगीचे नेमके कारण देखील अद्याप समजू शकलेले नाही. मयत तरुण त्याच दुकानात काम करत होता आणि दुकानातच राहत होता. दुकानाच्या पोटमाळ्यावर ही आग लागली.
त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत जाण्यास अडचण आली. काही वेळेनेनंतर जवानांनी शटर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी अकित मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्याचा मृत्यू नेमका आगीत होरपळून झाला की गुदमरून झाला याची माहिती शवविच्छेदनानंतर मिळणार आहे.


















