- विषय मंजुरीचे आदेश असतानाही सभा तहकूब…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०७ जानेवारी २०२०) :- बुधवारच्या स्थायी समितीत भाजप नेत्यांचे विषय मंजूर करण्याचे आदेश असतानाही विषय नाही तर आठवड्याची सभाच तहकूब करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात औषध खरेदी, मास्कनंतर आता कोविड केअर सेंटरमधील गैरव्यवहाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. रावेत येथील एका हॉस्पीटलच्या कोविड केअर सेंटरला ३ कोटी २९ लाख १३ हजारांचे बील देण्याचा विषय बुधवारी स्थायी समितीसमोर ठेवला होता.
सोळा संस्थांनी कामे केली असताना केवळ एकाच संस्थेचे बील देण्याचा अट्टहास सत्ताधारी भाजपने ठेवला होता. तसेच सत्तेतील विरोधक आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांची अडवा आणि जिरवा असे धोरण भाजपने स्वीकारले आहे.