- दिवसभरात तब्बल आठ एकांकीचे सादरीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२१) :- अखिल भारतीय मराठी नाट्य परीषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे घेण्यात येणार्या गडकरी करंडक एकांकीका स्पर्धेची सुरुवात नेहमी प्रमाणे एकांकीका सादर करणार्या कलाकारांतर्फे दिप प्रज्वलन करुन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
कलापीनी नाट्य संस्था तळेगाव व बी.एम.सी.सी. कॉलेज पुणे या संस्थेचे कलाकार संजय मालकर, अनुजा बोरसे, अक्षय सिधये व पिंपरी चिंचवड नाट्य परीषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. पहील्या दिवसभरात म्हाराज म्येले, कुणी तरी पहिलं हव, मजार, द डे ऑफ कन्फेक्शन, मरणोत्पात, नॉ एक्झॉक्टली बट सॉर्ट ऑफ, यंदा कर्तव्य आहे, जाळ्यातील खिळे या आठ एकांकीका सादर करण्यात आल्या.
सातत्यानं २१ वर्षे ही स्पर्धा होत असून स्पर्धेचे हे २२ वे वर्ष आहे. कोविड च्या जवळजवळ १० महिन्यांमधे कलाकारांच्या कलेला वाव न मिळाल्याने, यंदा कलाकार संघांनी अत्यंत विक्रमी संख्येत आपल्या प्रवेशिका पाठविल्या. ही स्पर्धा जाहीर झाल्यापासून पहिल्या दहा दिवसांतच निर्धारीत बावीस प्रवेशिका संपल्या. त्यानंतर बाहेरगांवच्या संघांनी आग्रह केल्यामुळे सुरवातीस १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान नियोजिलेली ही स्पर्धा ११ तारखेसाठी वाढविण्यात आली.
यंदा स्पर्धेत एकूण ३५ संघ सहभागी होत असून त्यात तब्बल २१ संघ बाहेर गांवचे आहेत. यात चंद्रपूर, अमरावती , ठाणे, नाशिक, नवी मुंबई, मुंबई ,सोलापूर , इचलकरंजी असे राज्यातील विविध भागातून स्पर्धक आलेले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी , म्हणजे रविवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६वांजता पारितोषिक वितरण समारंभ होणारआहे. कोहिनूर ग्रुपचे प्रायोजकत्व असलेल्या या स्पर्धेचे संयोजन सर्वश्री सुहास जोशी, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, राजेंद्र बंग, जयराज काळे, नितीन शिंदे, संतोष शिंदे, महेश लाकाळ तसेच गौरी लोंढे करीत आहेत, अशी माहिती भाऊसाहेब भोईर यांनी दिली.


















