- ११७ जणांना बाधा, १०९ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १२ फेब्रुवारी) रोजी ११७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील व हद्दीबाहेरील एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०१४९८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९७९०१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८२६ जणांचा मृत्यू झालेला आहे.


















