- आज २८१ रुग्णांना बाधा तर, ३० जणांना डिश्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १९ फेब्रुवारी) रोजी २८१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील व बाहेरील एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०२६९८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९८१६५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८२८ जणांचा मृत्यू झालेला आहे.