- बौद्धनगर, पिंपरीतील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२१) :- कार न दिल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून मित्रावर कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. २१) बौद्धनगर, पिंपरी येथे घडली.
महेंद्र नामदे गायकवाड (३२, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी पोलिसांत फिर्याद दिल आहे. त्यानुसार पंकज संभाजी माने (२६) आशिष कांबळे (२४), गोपाळ तळेकर (२५), अमर गौतम चिकटे (२५, सर्व रा. बौद्धनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्ह दाखल आहे.
फिर्यादी गायकवाड आणि आरोपी मित्र आहेत. गायकवाड यांची कार नेहमी घेऊन जात होते. दरम्यान, काही दिवसांपासून गायकवाडने त्यांना कार देणे बंद केलं. त्याचा राग धरून आरोपीने त्यांना मारहाण करीत कोयत्याने वार केले.