- कोरोनामुळे पालिकेची सर्वसाधरण सभा ऑनलाइन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७. मार्च २०२१) :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिकांच्या महासभा आणि आमसभा प्रत्यक्ष घेणे सध्या तरी शक्य नाही. या महासभा आणि आमसभा ऑनलाइन घेतल्या जातील अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.
तसे प्रतिज्ञापत्रच राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत हायकोर्टात सादर करण्यात आले. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब आणि मार्च महिन्याची नियमित सभा उद्या आयोजित केली आहे.
शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने महासभा ऑनलाइन होणार आहे. नगरसेवक, अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सभेला उपस्थित राहणार आहेत.















