- महाराष्ट्र मजदूर संघटनेची स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमीत्त आदरांजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- अंगमेहनतीचे काम करणा-या, डोक्यावर भार वाहून नेणा-या माथाडी, मापाडी, हमाल कामगारांच्या जिवनात स्व. आण्णासाहेब पाटील यांच्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण झाले. त्यांचे जिवन सुखमय व त्यांना संघटीत करून त्यांच्या हक्कासाठी त्यांनी सदैव आपले आयुष्य समर्पित केले.
त्यांच्या दिशादर्शनामुळेच महाराष्ट्र मजदूर संघटनेने आज संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात माथाडी कायद्याची अमंलबजावणी करण्यात यश मिळवले. त्यामुळे लाखो कामगारांना त्याचा फायदा मिळाला. आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष, राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख इरफानभाई सय्यद यांनी केले.
माथाडी कामगारांचे दैवत स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमीत्त चिंचवडच्या केसबी चौकातील स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, शिवसेना सहसंपर्कप्रमुख इरफानभाई सय्यद, सल्लागार बाळासाहेब शिंदे, पुणे माथाडी बोर्ड सदस्य परेश मोरे, पिंपरी चिंचवड माथाडी बोर्ड सदस्य प्रविण जाधव, भिवाजी वाटेकर, खंडु गवळी, पांडुरंग काळोखे, सर्जेराव कचरे, आप्पा कौधरी, सतीश कंठाळे, गोरक्ष दुबाले, आबा मांढरे, समर्थ नायकवडे तसेच माथाडी कामगार उपस्थित होते.
















