न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२१) :- भारतीय स्वातंत्र्य लढयामध्ये स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणा-या शहीद भगतसिंग, राजगुरु, आणि सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, विकास डोळस, सागर आंगोळकर, नगरसदस्य संजय नेवाळे, मयूर कलाटे, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, झामाबाई बारणे, करुणा चिंचवडे, प्रियांका बारसे, सुनिता तापकीर, निर्मला कुटे, अनुराधा गोरखे, आरती चौंधे, संगिता भोंडवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
दापोडी येथील शहीद भगतसिंग आणि हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या अर्धाकृती पुतळयास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसदस्य राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे, ज्येष्ठ नागरिक शिवाजी रुपनर आदी उपस्थित
होते.
कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शाहूमहाराज (के.एस.बी) चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसदस्या कै. अण्णासाहेब पाटील संस्थापित युनियन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सचिव हनुमंत तरडे, किशोर सातकर, शंकर निकम, संजय श्रीराम, दुर्गेश पाटील, शंकर शेलार, बाळू ओव्हाळ, चेतन थोरवे, राहुल तापकीर, भरत इथापे, बाळू गवारी, सुरेश ठिक, संतोष जाधव, राहुल शिर्के, किर्तीराज तरडे, विलास कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
















