- शहरातील ११ सराईत गुन्हेगार एकाच दिवशी तडीपार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील ११ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी एकाच दिवशी तडीपार केले आहे. भोसरी पोलीस ठाण्यातील तीन, चाकण, आळंदी, दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, चिंचवड, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हेगाराचा समावेश आहे.
भोसरी पोलीस ठाण्यातील शकील कासीम शेख (वय २४, रा. कासारवाडी), अमोल शांताराम नितोने (वय २०, रा. भोसरी), रवींद्र उर्फ गोट्या बन्सीलाल भालेराव (वय २२, रा. भोसरी), चाकण पोलीस ठाण्यातील ओंकार मछिंद्र झगडे (वय २४, रा. चाकण), रोहन महेंद्र धोगरे (वय २२, रा. चाकण), आळंदी पोलीस ठाण्यातील गौरव धर्मराज भूमकर (वय २३, रा. चिंबळी, ता खेड), दिगंबर उर्फ डिग्या विठ्ठल कदम (वय ३०, रा. आळंदी), दिघी पोलीस ठाण्यातील राहुल एकनाथ धनवडे (वय २१, रा. च-होली बु.), महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. बोपखेल), चिंचवड पोलीस ठाण्यातील वीरेंद्र उर्फ बेन्द्या भोलेनाथ सोनी (वय २०, रा. वाल्हेकरवाडी), एमआयडीसी भोसरी मधील एक आरोपी अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्हेगारांना २६ मार्च २०२१ पासून दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
















