न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. २६ मार्च) रोजी १८२५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०६ पुरुष – निगडी (७२ वर्षे), पिंपरी (८१, ६६, ३० वर्षे), चिखली ( ५० वर्ष), चिंचवड (८० वर्षे), ०१ स्त्री – चऱ्होली (३७ वर्ष) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले ३ पुरुष हे सोलापूर (७९ वर्षे), लोहगाव (४० वर्षे), पुणे (८३ वर्षे), ०३ स्त्री – तळेगाव (७० वर्षे), जुन्नर (४० वर्षे), खेड (६० वर्षे) येथील रहिवासी आहेत. आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ५ मृत्यु झाले आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १३०५७२ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११३६४८ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १९५७ जणांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या अ – २६७, ब – २९७, क – १६२, ड – ३०१, इ – १५९, फ – २५२, ग – २६४, ह – १२३, एकुण – १८२५.
















