- छापा मारून आठ जणांना अटक..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ एप्रिल २०२१) :- थेरगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी आठ जणांना अटक केली. सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. ७) दुपारी ही कारवाई केली.
दुर्गाराम रुपाराम पटेल (४५, रा. मयुर पवार, पवार नगर, थेरगाव), रामदास मारुती जांभुळकर (३७, रा. आयोध्या बिल्डींग, शिंदेनगर, जुनी सांगवी), दिलीप बजरंग बारणे (६१, रा. पदमजी पेपर मिल समोर, थेरगाव), बाबासाहेब सीताराम सूर्यवंशी (४८, रा. गुरव चाळ, सोळा नंबर, थेरगाव), ज्ञानोबा ईश्वर पाटील (४०, रा. पद्मजी पेपर मिलसमोर, थेरगाव), संजय रोहिदास मोरे (वय ३६, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), संजय मच्छिद्र मिसाळ (४१, रा. कावेरी भाजी मंडईजवळ, थेरगाव), मंगेश सुदाम केदारी (३६, रा. सोळा नंबर बस स्टॉप, बेलठिकानगर, थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकातील पोलिस नाईक भगवंता चिंधू मुठे (वय ३५) यांनी बुधवारी (दि. ७) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगावातील मयुर पवार यांच्या बिल्डींगमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी बुधवारी दुपारी छापा मारून आरोपींना अटक केली.