- नाव नोंदणीचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२१) :- आज कोरोना महामारीने सगळं जग त्रस्त आहे. यातुन आपण पण बचावलेलो नाहीत, आज सगळीकडे या महामारीने मानवजातीला हैराण करून सोडलेले आहे. वयस्कर व ईतर दुर्धर आजर असणाऱ्यांना यातुन सावरण्यास खुप जड जात आहे. तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असल्यामुळे त्यांचे दगावण्याचे प्रमाण जास्त आहे.
यावर उपाय काय? तर ज्यांची कोरोना होऊन २८ दिवस पूर्ण झालेत अश्या सर्व सदृढ व सशक्त जणांनी त्यांच्या शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती प्लाझ्माच्या रूपात देऊन आपण २ नागरिकांचे प्राण वाचवु शकता.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन पेक्षाही जास्त महत्वाचे प्लाझ्मा आहे आणि तो आपल्या सर्वांकडे आहे. सर्व प्रकारे आपण मदत तर करतोच आहोत पण प्लाझ्मारूपी मदत ही खूप मोलाची असेल. प्रत्येक प्लाझ्मादान करणा-या व्यक्तीला महापौर माई ढोरे यांच्याकडून १०००/- रू बक्षिसरूपी मदत केली जाणार आहे. जास्तीत जास्त व्यक्तीनी प्लाझ्मा दान करावे, प्लाझ्मा दानासाठी ९०४९६१३७०० -निलेश, ९५२७४२५२०२-अक्षय,९५९५१५०५०-जे.डी. यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.