न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २७ डिसें.) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल, यमुनानगर निगड़ीतील शिक्षिका जयश्री चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) तर्फे हैद्राबाद येथे “प्राकृतिक एव् सांस्कृतिक विरासत के संरक्षण मे स्कूलो की भूमिका” या विषयासाठी निवड झाली होती.
त्यात ११ दिवासांचे प्रशिक्षण पूर्ण केले असता, प्रशिक्षणात भारतातील शिल्पकला, स्त्री पुरुष समानता, स्वच्छ भारत अभियान, आमचा सांस्कृतिक वारसा, ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक संसाधने, शालेय विषय ज्ञान व शैक्षणिक साधने तयार करणे याबद्दल अधिक माहिती मिळवली. याचा शालेय अध्यापनात विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रशिक्षणात उत्तर महाराष्ट्रातील जाती-जमाती या विषयावरील प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रशिक्षणात भारतातील १४ राज्यातील प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. त्यापैकी महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला.
या प्रशिक्षणासाठी प्रशालेचे प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी मोलाचे सहकार्य केलेे. प्रो. ए. सो. चे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, संस्थेचे सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे यानी कौतुक केले.















