- तरुणीचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६. जुलै. २०२१) :- पीडित तरुणीला लग्नाचे अमिश दाखवले. त्यानंतर तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीला शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केली. एवढे करून त्याला लग्नाबाबत विचारले असता आरोपीने तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
ती हॉस्पिटलमध्ये असताना आरोपीने तरुणीने लिहून ठेवलेली डायरी, मोबाईल मधील सर्व फोटो, मेसेज, रेकॉर्डिंग डिलीट केले. अजित अनंत भांगे या व्यक्तीच्या फोनवरून पीडित तरुणीला फोन करून ‘तू अविनाशला मेसेज का केलेस. तू त्याचे दोन वर्षे आयुष्य बरबाद केले आहे. तू त्याच्याशी लग्न करून त्याला बरबाद करणार आहेस का’ असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना जून २०१९ ते १३ जुलै २०२१ या कालावधीत मळवली स्टेशन लोणावळा येथे एका लॉजवर, पीडित तरुणीच्या घरी आणि हिंजवडीमधील हॉटेल ट्विन्स टॉवर लॉजिंग येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अविनाश अनंत भांगे (वय २७, रा. नखातेवस्ती, काळेवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने गुरुवारी (दि. १४) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.