- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख १३ बसस्थानकांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी फेस रीडिंग सुरू करण्यात आले. नुकतीच फेसरीडिंगची आधुनिक प्रणाली सुरू करण्यात आली असल्याने, जुनी हजेरीची स्वाक्षरी पद्धत बंद करण्यात आली. नव्या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार आहे.
पुणे व पिंपरी – चिंचवड पीएमपीकडून सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यात येते. पीएमपीमध्ये सुमारे दहा हजार कर्मचारी कार्यरत आहे. पुणे व पिंपरी – चिंचवड या दोन्ही शहरात पीएमपीचे एकूण १३ आगार आहेत. कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीसाठी रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करून उपस्थिती नोंदवली जात होती.
पीएमपीच्या व पुणे पिंपरी – चिंचवड शहरातील प्रमुख १३ बसस्थानकांवर फेसरीडिंग बसविण्यात आले आहे. यामुळे कर्मचारी कामावर कधी आला व गेला, याची माहिती मिळण्यास मदत होते. या प्रणालीमुळे सकारात्मक परिणाम आगाराच्या कामात दिसून येत आहे. कर्मचारी वेळेवर कामावर हजर राहत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या बसेससुद्धा वेळेत मार्गावर धावत असल्याचे चित्र आहे.
















