तरूण अटकेत; सांगवी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- मुलीच्या घरासमोरील दुकानाच्या बाहेर थांबून वाईट नजरेने बघून तसेच वाईट इशारे करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करून त्या अकाऊंटच्या प्रोफाईलला मुलीचा फोटो ठेवला.
त्यानंतर मुलीच्या वडिलांचा मोबाईल नंबर अपलोड केला. त्यानंतर त्या अकाउंटवर महिलांचे काही अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले. जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीने या प्रकरणी सोमवारी (दि. ९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यश भिंगे (वय २५, पत्ता माहीत नाही), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.
















