- उपस्थित मान्यवरांची झेंड्याला मानवंदना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७५ वा वर्धापनदिन व पिं. चिं. म. न. पा. प्राथमिक शाळा कुदळवाडी येथे नवीन इमारतीमध्ये संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी झेंड्याला मानवंदना दिली.
ध्वजारोहणासाठी नगरसेवक संजय नेवाळे, स्वी. नगरसदस्य दिनेश यादव, वृक्ष प्राधीकरण समिती सदस्य आनंदा यादव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंगल घुले, बबन मोरे, मोरे ताई, मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत पोटघन सर यांनी तर, उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक नानासाहेब सगभोर यांनी केले.