- माजी सैनिक आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन शिवसेनेच्या काळेवाडी-रहाटणी विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिक व कोरोना काळामध्ये प्लाझ्मादान करून भारतामध्ये नावलौकिक केलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शिवसेना उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते व विभागप्रमुख गोरख पाटील यांनी आयोजन केले.
यावेळी हभप तुकाराम हापसे महाराज, अल्पसंख्याक शहराध्यक्ष दस्तगीर मनियार, सामाजिक कार्यकर्ते संजय गायके, पवना हेल्थ क्लबचे सर्व सन्माननीय सभासद, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, कोळी समाजाचे अध्यक्ष डी.एम. कोळी, राकेश नखाते, कैलास सातपुते या मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिक कॅप्टन राजेंद्र महाडिक, पतंगराव सुतार, दिनकर जाधव, विलास निकम, इंदूभांण वाघचौरे ,परशुराम जाधव, शंकर भोसले,बाजीराव गायकवाड, तुळशीराम कदम, ज्ञानदेव गायकवाड, दीपक परदेशी व प्लाज्मादान मॅन सुजित भोसले या सर्वांचा सत्कार करण्यात आला. बालकलाकार अखिलेश संतोष कुंभार याने देशावर स्वातंत्र्यापासून सर्व शूरवीरांचा गाभा समाजापुढे सादर केला.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, विभागसंघटक गणेश वायभट, अंकुश कोळेकर, अनिल पालांडे,बाळासाहेब येडे, नरसिंग माने, रविकिरण घटकर, राजू शिंदे, भागवत वायभट, अक्षय घटकर, सावताराम महापुरे, प्रजाक नेढे व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिवसेना विभागप्रमुख गोरख पाटील यांनी केले.