- वाकड पोलिसात १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२१) :- फिर्यादी यांची पत्नी ही जातपंचायतीच्या पाटलांची नातेवाईक आहे. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीचा कौटुंबिक वादातून घटस्फोटाचा दावा न्यायालयात चालू आहे, असे असताना फिर्यादीने जातपंचायतीकडून घटस्फोट घेतला नाही, याचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला समाजातून वाळीत टाकले.
याप्रकरणी सामाजिक बहिष्कार (प्रतिबंध व निवारण) अधिनियम २०१६ चे कलम ५, ६ प्रमाणे तसेच भारतीय दंड विधान १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ मार्च २०१८ ते १ सप्टेंबर २०२१ या कालावधीत न्यू दत्त नगर वाकड आणि महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथे घडला. सिताराम कृष्णा सागरे (वय ३३, रा. न्यू दत्त नगर, वाकड आणि महिंदरगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे (चौघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), मोहन शामराव उगाडे, मनोज सागरे, विजय सागरे, रामदास भोरे, अमर भोरे, महादेव भोरे, मारुती वाघमारे, विष्णू वाघमारे, अमृत भोरे, गोविंद वाघमारे या १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.