- दोन्ही तोतयांना पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२१) :- पोलीस नाईक सांगवी परिसरात मंगळवारी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सृष्टी चौकातील एका पान टपरीवर दोघेजण संशयितपणे थांबल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यातील एकाने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. तर एकाने एसबीआय बँकेत क्रेडिट मॅनेजर असल्याचे सांगितले. दोघेही लोकसेवक नव्हते. एकाने पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवण्यासाठी पोलिसांचा गणवेश परिधान केला होता. तर दुस-याने एसबीआय बँकेचा ड्रेस कोड परिधान केला होता. दोघे आरोपी सार्वजनिक ठिकाणी जाऊन दुकानदारांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागत होते.
बुद्धभूषण अशोक कांबळे (वय २७, रा. म्हेत्रे वस्ती, टॉवर लाईन, निगडी), औदुंबर भारत जाधव (वय २९, रा. कासारवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक प्रमोद गोडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक येडे तपास करीत आहेत.