- जाधववाडीत शेळीला शॉक बसून पोटातील पिलांसह जागीच मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२१) :- रस्त्याच्या साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्याने एका शेळीला शॉक बसून तिच्या पोटात असलेल्या दोन पिलांसह तीचा मृत्यू झाला आहे. जाधववाडीतील राजे शिवाजीनगर येथील आयुष गार्डन जवळ ही घटना घडली.
रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे खोदकाम करताना सर्व्हिस मीटरची केबल ब्रेक झाली होती. त्यात पाऊस सुरू असल्याने परिसरात साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह प्रवाहीत झाल्याने येथून जाणाऱ्या शेळीला शॉक बसला. त्यामध्ये शेळीसह तिच्या पोटात असणाऱ्या दोन करडांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मनुष्यांची विकासकामे आता प्राण्यांच्या अंगलट येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि महावितरणकडून होत असलेल्या सुमार कामांविषयी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.