न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ४ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता-२ प्रमोद सुधाकर ओंभासे यांना लाचखोरीच्या आरोपावरून महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ४ नोव्हेंबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले. ओभासे यांनी ३८ लाख रुपयांच्या टेंडरच्या फाईलवर सही करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याचे आदेशात नमूद आहे.
या प्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, त्यांना २९ ऑक्टोबरपासून निलंबित करण्यात आले असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच १५ दिवसांत दोषारोपपत्र ठेवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.











![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/253689-150kb-90x60.jpg)





