- एकावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- चिखलीतील मोरेवस्ती येथे राहणाऱ्या इसमाने वेगवेगळ्या तारखांना विविध रकमेच्या लिलाव भिशी चालवल्या. त्याने फिर्यादी आणि अन्य काही लोकांना लिलाव भिशीसाठी सभासद करून घेतले. त्यांच्याकडून दर महा भिशीच्या रकमा स्वीकारल्या. त्यानंतर सभासदांना पैसे न देता त्यांची तब्बल १९ लाख ४३ हजार २३ रुपयांची फसवणूक केली.
ही घटना २०१९ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान घडली. शिवाजी अजिनाथ कापसे (वय ४२, रा. चिखली) यांनी गुरुवारी (दि. २३) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार रफिक इसाक तांबोळी (मूळ रा. चंगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.